तारेंद्र बोर्डे यांनी पुसद नप अध्यक्ष पदाकरिता घेतली इच्छुक उमेदवारांची मुलाखत

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
पुसद, 
tarendra-borde : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे नगरपालिकानिहाय पक्षनिरीक्षक म्हणून जिल्ह्याबाहेरील भाजपा पदाधिकाèयांची नेमणूक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 3 नोव्हेंबर 2025 रोजी पुसद येथे पक्ष निरीक्षक म्हणून वणी येथील माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.
 
 
y4Nov-Tarendra
 
या बैठकीला पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, ज्येष्ठ नेते, नगरसेवक तथा नप अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा सर्व नगरपालिकेवर फडकला पाहिजे. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. रन फॉर युनिटी, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्प तसेच वंदे मातरम् यांची 150 वी वर्षगाठ प्रभागनिहाय साजरी करण्याचे आदेश पक्ष निरीक्षक तारेंद्र बोर्डे यांच्यामार्फत देण्यात आले.
 
 
यावेळी तारेंद्र बोर्डे यांच्यामार्फत नप अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची स्वतंत्र मुलाखत घेण्यात आली. नप अध्यक्ष पदासाठी भाजपामधून बरेच व्यक्ती इच्छुक असल्यामुळे परंतु नप अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी ही फक्त एकाच व्यक्तीला मिळणार असल्यामुळे भविष्यात याचा परिणाम निवडणुकीवर पडू नये. या अनुषंगाने ज्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीतर्फे नप अध्यक्षपदाचे तिकीट मिळेल त्याच्यासोबत इतर इच्छुक उमेदवार तन-मन-धनाने सोबत राहतील, असा एकमताने ठाम निर्धार करण्यात आला.
 
 
या बैठकीतून हे स्पष्ट झाले की, आगामी निवडणुकीत भाजपा संघटनात्मकदृष्ट्या अधिक प्रबळ, सज्ज आणि विजयी होण्यास तयार असून, भाजपाची टीम आता एकजूट-संघटन-विजय या मंत्राने पुसद नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यास सज्ज झाली आहे.