रस्त्याच्या वादात दोन गटात हाणामारी

महसूलच्या पथकालाही मज्जाव; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
अंजनगाव सुर्जी, 
two-groups-clash-over-road-dispute तालुक्यातील बोराळा येथील रस्ता मोकळा करण्याच्या कामादरम्यान चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन परिस्थिती ताणली गेली. त्यातच महसूलच्या पथकावसोबतही बाचाबाची करण्यात आली; मात्र पोलिसांच्या समयसूचकतेने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
two-groups-clash-over-road-dispute
 
मिळालेल्या माहितीनुसार, बोराळा येथील रामदास वासुदेव चिकटे व सहा जणांनी शेतीसाठी रस्ता मोकळा करण्याबाबत तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्या तक्रारीनुसार ३ नोव्हेंबरला महसूल विभागाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार रवींद्र काळे, नायब तहसीलदार प्रकाश बाबनोटे, मंडळ अधिकारी अनिल केदार, तलाठी अंजली वसू, तसेच ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिकारी सूरज तेलगोटे, पोलिस अधिकारी मुळे, पोलिस कर्मचारी अरबट आदी घटनास्थळी उपस्थित होते. two-groups-clash-over-road-dispute शेतशिवारात प्रत्यक्ष रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असताना उमेश गणेश चिकटे (४१), सतीश गणेश चिकटे (४३), संजय गणेश चिकटे (४५) व ऋतिक संजय चिकटे (२०, सर्व रा. बोराळा) यांनी विरोध दर्शवून आमचा जीव गेला तरी रस्ता काढू देत नाही असे सांगत महसूल कर्मचार्‍यांवर धावून गेले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले प्रफुल्ल चिकटे, सुनील सहदेव चिकटे, रामदास वासुदेव चिकटे, शशिकांत मधुकर चिकटे हे रस्त्यावरील काटे काढण्याचे काम करीत होते. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आणि हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. परंतु पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून ती स्थिती नियंत्रणात आणली व संभाव्य जीवितहानी टळली. या घटनेप्रकरणी उमेश, सतीश, संजय आणि ऋतिक चिकटे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.