दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
दर्यापूर,
amravati-accident अकोल्यावरून दर्यापूरकडे व दहीहंडावरून येणार्‍या दोन दुचाकींचा समोरासमोर धडक लागून अपघात झाला. यात दोन जण जागीच ठार झाले आहे.
 
 
amravati-accident
 
मंगळवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास दर्यापूर ते अकोला मार्गावर ग्राम गोळेगाव फाटा नजीक दोन मोटरसायकलचा समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. amravati-accident दोन्ही मोटरसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये दर्यापूर येथील ४२ वर्षीय रहिवासी गणेश पांडूरंग राठोड व अमरावती येथील मंगेश जायले यांचा समावेश आहे. ठाणेदार सुनील वानखडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मंगेश जायले हे चारचाकी वाहनाचे चालक असल्याची माहिती असून मनपाच्या आरोग्य अधिकार्‍याच्या ते गाडीवर होते.