वादग्रस्त पेट्रोलपंप हटवून आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

सकल शिवप्रेमी सामाजिक संघटनेची मागणी ,बाजारपेठ ठप्प, शांतीपूर्ण वातावरणात बंद यशस्वी

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा उमरखेड,
umarkhed petrol pump controversy, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यालगत असलेल्या वादग्रस्त पेट्रोल पंपाची लीज मुदतीसह सर्व कायदेशीर अटी संपूनही तो अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप करत, पंप तत्काळ सील करावा आणि आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
 

umarkhed petrol pump controversy, 
या बंदला शिवभक्क्त, व्यापारी, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने, हॉटेल्स, किराणा दुकाने आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिले.शहरात शांतता आणि संयमाचे वातावरण असले तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेषत: महात्मा गांधी चौक परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
बंददरम्यान महात्मा गांधी चौकात आंदोलनकर्त्यांनी शांततेत ठिय्या मांडला. काही आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणास अडथळा ठरणारा हा पेट्रोल पंप लीज संपून तीन महिने उलटले तरीही बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले. यासंदर्भात गेल्या महिनाभरापासून नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर समितीच्या सदस्यांनी बेमुदत उपोषण आणि साखळी उपोषण सुरू ठेवले होते.
परंतु, उपविभागीय umarkhed petrol pump controversy, महसूल अधिकारी यांच्या आदेशाने उपोषण मंडप हटवून पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व काहींना तुरुंगात पाठवले. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाèयांवर प्रशासनाची हुकूमशाही आम्ही सहन करणार नाही, असा संतप्त सूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
 
 
या दरम्यान उपविभागीय महसूल अधिकारी व आमदार किसन वानखेडे यांच्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीत तोडगा काढून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला अडथळा निर्माण करणाèया पेट्रोलपंपाचे कॅबिन काढण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकाèयांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्या. तरीही आंदोलकांनी मागण्या मान्य नसल्याने आंदोलन मात्र आपल्या मागणी ठाम असल्याचे दिसून आले.
 
 
आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी, लिज संपलेल्या व अवैधरित्या सुरू असलेल्या भारत पेट्रोलपंपाला त्वरित सील करावे, आंदोलनकर्त्यांवर अमानुष वर्तन करणाèया अधिकाèयांवर निलंबनाची कारवाई करावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची नियुक्ती करावी या मागणीसह आंदोलकांनी तीव्र भूमिका घेतली होती. या आंदोलनात अनेक शिवभक्तांचा सहभाग होता.