देव दिवाळीला बनणार अनोखा राजयोग!

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
Unique Rajyoga for Diwali कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस दरवर्षी देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या पंधराव्या दिवशी साजरी होणारी ही दिव्यांची देवांसाठीची दिवाळी वाराणसीत विशेष भक्तिभावाने साजरी केली जाते. गंगेच्या घाटांवर हजारो दिव्यांच्या प्रकाशात देव दिवाळीचे अप्रतिम सौंदर्य खुलते.
 

Unique Rajyoga for Diwali 
 संग्रहित फोटो
या वर्षी देव दिवाळी ५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार असून, या दिवशी आकाशात एक विलक्षण ग्रहयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र मेष राशीत भ्रमण करणार असून शनि मीन राशीत वक्री राहील. गुरु आपल्या उच्च राशीत असल्याने हंसराजयोग, तर मंगळ वृश्चिक राशीत स्वतःच्या घरात राहून रुचक राजयोग तयार करणार आहे. तसेच सूर्य आणि शुक्र तूळ राशीत एकत्र येऊन शुक्रादित्य योग निर्माण करीत आहेत. या शुभ संयोगांसोबतच अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योग देखील तयार होत आहेत. या दिवशी तयार होणाऱ्या या दुर्मिळ ग्रहसंयोगांमुळे काही राशींना अनपेक्षित लाभ मिळणार असून त्यांच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरणार आहे.
 
 
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना या दिवशी आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. दीर्घकाळापासून अडकलेली रक्कम परत मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा मान-सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण होईल आणि आरोग्यही चांगले राहील. आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे.
मेष राशी
या राशीच्या लोकांसाठी देव दीपावली नवीन सुरुवातींचा काळ ठरणार आहे. नवे व्यवसाय, गुंतवणूक किंवा मालमत्ता व्यवहारांमध्ये फायदा होईल. जुन्या समस्यांचे समाधान मिळेल. मानसिक समाधान आणि आर्थिक प्रगती दोन्ही साध्य होतील. दीर्घकालीन यशाचे संकेतही मिळतील.
 
वृश्चिक राशी
या राशीच्या जातकांसाठी देव दीपावलीचा दिवस अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि बढतीची शक्यता निर्माण होईल. व्यवसायिकांना नवीन संधी मिळतील आणि थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल.
 
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.