भाजपा वर्धा जिल्हा महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
वर्धा,
Vaishali Yerawar भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या मान्यतेनंतर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार यांनी जिल्हा कार्यकारणी घोषित केली.पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे यांच्या सहमतीने कार्यकारणी करण्यात येऊन आज घोषित करण्यात आली.
 

Vaishali Yerawar  
जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार यांनी उपाध्यक्ष : नलिनी सयाम, मंदा चौधरी (हिंगणघाट), शुभांगी भीवगडे (आर्वी), वर्षा बोकडे (वर्धा), शुभांगी कुर्जेकर (देवळी), शिल्पा ठाकूर (पुलगाव), शालिनी नागपूरे (आष्टी), सरस्वती मडावी (वर्धा). सरचिटणीस श्रेया देशमुख (वर्धा), रविला आखाडे (हिंगणघाट), सारिका लोखंडे (आर्वी), माधुरी इंगळे (पुलगाव). कोषाध्यक्ष : शोभा तडस (देवळी), चिटणीस : वैशाली पेटकर व प्रिया दोडके (हिंगणघाट), चंदा ढगे (नाचणगाव), वैशाली उघडे (शिरसगाव), रजनी मानमोडे (कारंजा), हेमलता भगत (आष्टी), कमल गिरी, पुनम डकरे, सुनीता तडस (वर्धा), विधानसभा प्रमुख आर्वी : सुवर्णा चौधरी, देवळी : नीलिमा पळसकर, हिंगणघाट : शिला सोनारे, वर्धा : चित्रा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.