पत्नीला बेशुद्ध करून बनवायचा अश्लील व्हिडिओ

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
गोरखपूर,
Wife's video गोरखपूरमध्ये नातेसंबंधांचा विश्वास चिरडणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गोरखनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं आपल्या पतीविरुद्ध धक्कादायक आरोप केले आहेत. तिचा पती तिला नशेचं औषध देऊन बेशुद्ध करायचा आणि त्या अवस्थेत तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. नंतर तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या बदल्यात तब्बल १० लाख रुपयांची मागणी करत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेनं थेट पोलिसांकडे धाव घेतली असून, पतीसोबतच सासू-सासऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
Wife
महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पती सीतापूरमधील एका उद्योगसंस्थेत काम करतो आणि तिथेच त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. त्या संबंधांना जपण्यासाठीच तो पत्नीला दूर करण्याचा प्रयत्न करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने पिण्याच्या पाण्यात नशेचं औषध मिसळून पत्नीला दिलं, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो ब्लॅकमेलिंगसाठी वापरला. आता तो तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत असून, त्या बदल्यात १० लाख रुपयांची मागणी करत आहे.
 
फिर्यादी महिलेने हेही सांगितले की, लग्नानंतरपासूनच तिचा पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. तिला वारंवार मारहाण केली जायची आणि घराबाहेर काढण्यात यायचं. २०१६ मध्ये पंचायतीत एक तोडगा निघाला होता, मात्र त्यानंतरही त्रास सुरूच राहिला. शेवटी ती सर्व सहनशक्ती संपल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाबाबत गोरखनाथ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशी भूषण राय यांनी माहिती दिली की, महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक अजय कुमार श्रीवास्तव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेचे सर्व पैलू तपासून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.