शासन माहितीची बोलकी भिंत..

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
ग्राम महसूल अधिकारी कामराज चौधरी यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पुसद, 
ग्राममहसूल अधिकारी पुसद खंड २ ता. पुसद Kamraj Chaudhary कामराज बसुअण्णा चौधरी यांनी त्यांच्या कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी विविध योजनाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी शासन माहितीची बोलकी भिंत या अंतर्गत बोलकी भिंत तयार केली आहे.  त्या भिंतीवरील दिलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यावर शासनाच्या खालील योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाची बचत होते. माहिती मिळवण्यासाठी विविध कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहत नाही. या शासन बोलकी भिंतिचे उद्घाटन ग्राम महसूल अधिकारी कार्यालय पुसद खंड २ येथे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांचे हस्ते व तहसीलदार महादेव जोरवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
 
kamraj
 
या भिंतीवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर संजय गांधी निराधार अनुदान योजना, शेतकर्‍यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अ‍ॅगि‘स्टॅक आणि फार्मर आयडी, कृषी विभाग योजना माहिती, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, खाद्यपदार्थ प्रकि‘या अंतर्गत उद्योग, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, बार्टी, सारथी, महाज्योती अशा योजनांची माहिती मिळणार आहे.
 
 
Kamraj Chaudhary शासन माहितीची ही बोलकी भिंत सतत अद्यावत होत राहणार असल्याने सर्व योजनांची माहिती मिळणार आहे. या भिंतीमुळे नागरिकांना योजना शोधण्यासाठी विविध कार्यालयात गरज नाही. मोबाईलवरच सर्व माहिती मिळते. पारदर्शकता आणि डिजिटल सक्षमीकरण वाढते. शासकीय योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचतात. कार्यालयीन वेळ आणि मनुष्यबळाची बचत होते. योजनेच्या उद्घाटनास मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलाठी नीलांजन वानखेडे, गजानन कवाणे, राहुल खाडे, गोपीनाथ इंगोले व महसूल सेवक रोहन बिडकर उपस्थित होते.