शिवसेना (उबाठा) पक्षातून किशोर तिवारींचा राजीनामा

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
यवतमाळ, 
Kishore Tiwari  महाराष्ट्रातील शिवसेना (उबाठा)चे वरिष्ठ नेते आणि शेतकरी मिशनचे माजी अध्यक्ष तिवारी यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबतच्या कोणत्याही युतीला विरोध करत आपल्या पक्षातून राजीनामा दिला आहे. तिवारी यांनी पक्षाचा लोकसभेचा विजय हिंदी भाषिक आणि मुस्लिम समुदायांच्या पाठिंब्यामुळे झाला. मनसेशी हातमिळवणी केल्याने ही ‘व्होट बँक’ नाराज होऊ शकते.
 

kisaor 
 
त्यांनी या मुद्यावर उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्राला केराची टोपली दाखवली. मनसेशी युती केल्याने शिवसेना (उबाठा) गटाला नुकसान होईल. अलिकडच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिक व अमराठी मतदार आणि मुस्लिम समुदायाकडून पक्षाला मोठा पाठिंबा मिळाला. जर मनसेसोबत सहभागी झाले तर हाच घटक त्यांच्यापासून दूर जाईल असे Kishore Tiwari किशोर तिवारी यांनी सांगितले. मनसेकडे कोणतीही व्होटबँक नाही. राज ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत भाडेपट्टीवर काम करतात व त्यांच्यावर कोहिनूर गिरणी प्रकरण इडी सिबिआईकडे प्रलंबित आहे, असे किशोर तिवारी म्हणाले.