जिल्ह्यातील ५७६४ विद्यार्थांनी दिली तालुकास्तर महादीप परीक्षा

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांची विमानवारीची उत्सुकता शिगेला

यवतमाळ, 
यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाचव्या वर्षी 'Mahadeep Exam' महादीप परीक्षेचे आयोजन केले आहे. महादीप परीक्षेतून विमानवारी अशी ओळख या परीक्षेची आहे. त्यामूळे खेड्या पाड्यातील विदयार्थ्यांना विमानवारीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचली या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांत चुरस निर्माण झाली होती. या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना विमानवारी निश्चित असून विद्यार्थ्याना शाळास्तर, केंद्रस्तर या चाळणी महादीप परीक्षेतून तालुकास्तरीय पहिली फेरी ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १६ केंद्रावर घेण्यात आली.
 
 
pariksha
 
'Mahadeep Exam' महादीप परीक्षेत गुणवत्ता प्राप्त मराठी माध्यमाची ४९६६ व उर्दू माध्यमाच्या ७९८ अशा ५७६४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रथम फेरीतील या परीक्षेला ५७६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते आठवी पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तालुकास्तर महादीप परीक्षेच्या पहिल्या फेरीत तब्बल ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देऊन नवा विक‘म प्रस्थापित केला. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या परीक्षेला महत्त्व प्राप्त आहे. जिल्ह्यात १६ तालुक्यातील केंद्रावर चोख बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मु‘य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे यांच्या नियंत्रणात ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रावर भेटी दिल्या.
 
 
'Mahadeep Exam' यामध्ये उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे यांनी यवतमाळ, बाभुळगाव येथील केंद्रांना भेटी दिल्या. बैठक व्यवस्था, विविध सुविधांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, गटशिक्षणाधिकारी गणेश मैघने, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी प्रशांत मस्के उपस्थित होते. नेर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्या नियंत्रणात ही परीक्षा घेण्यात आली. यवतमाळ गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांच्या नियंत्रणात तालुका समन्वयक प्रीती ओरके यांच्या देखरेखीत ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, शिक्षक यांनी प्रयत्न केले. परीक्षा व्यवस्थापनासाठीसह समन्वयक राजकुमार भोयर, जिशान नाजिश, श्याम माळवे, राजहंस मेंढे यांनी परिश्रम घेतले.