अमरावती,
artificial-intelligence-courses श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या १८ शाळांमध्ये लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता हा अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर पाचवी ते बारावी करिता सुरू करण्यात येणार आहे. ३१ शिक्षकांनी नुकतेच रयत शिक्षण संस्थेत पाच दिवसाचे एआय प्रशिक्षण घेतले आहे. या संदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेत मंगळवारी नियोजन बैठक घेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला.

रयत शिक्षण शिक्षण संस्था, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ३१ शिक्षकांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन एआय प्रशिक्षण घेतले. सदर प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांची बैठक घेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेने त्यांचा आढावा घेतला. artificial-intelligence-courses प्रशिक्षित शिक्षकांनी आपल्या शाळेतील इतर शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमासाठी ट्रेनिंग देऊन एआय करिता नव्या शिक्षकांना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याकरिता लागणार्या सर्व सुविधा व सोयी श्री शिवाजी शिक्षण संस्था उपलब्ध करून देईल. प्रायोगिक तत्त्वावर सध्या हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून शिक्षकांनी याकरिता पुढाकार घ्यावा व आपल्या सहकार्यांना देखील प्रशिक्षित करावे, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी उपस्थित प्रशिक्षित शिक्षकांना केले. संस्थेचे उपव्यवस्थापक पंडित पंडागळे हे या उपक्रमाचे संस्थास्तरीय समन्वयक असून येत्या आठ दिवसात एआय उपक्रम संस्थेत सुरू करण्यात येणाऱ आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या सभेला संस्थेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारणी सदस्य सुरेश खोटरे, सचिव प्राचार्य वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, प्राचार्य अमोल महल्ले, सर्व शाळा तपासणी अधिकारी व प्रशिक्षित शिक्षकांची प्रामुख्याने उपस्थिती होती