भोंदूबाबाच्या नादात इंग्लंडमधील घर, शेती, सोनं विकले पण...

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
पुणे,
Cheating in the name of a fraudster पुण्यातील एका सुशिक्षित कुटुंबाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसवून तब्बल १४ कोटी रुपये गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या दांपत्याने आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी अशी मोठी फसवणूक सहन केली. कौटुंबिक अडचणी दूर होतील, मुलींना बरे होईल अशा खोट्या आश्वासनावर त्यांनी आपली संपूर्ण आयुष्यभराची कमाई गमावली. पैसे जमा करण्यासाठी त्यांनी परदेशातील घर आणि शेती विकली, तसेच सोन्यावर कर्जही घेतले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून तक्रार केली.
 
 

Cheating in the name of a fraudster 
पोलीस तक्रारीनुसार, पीडित दांपत्याची दोन मुली आजारी असून, त्यातील एका मुलीला अलुपेशीया नावाचा आजार आहे. भजनाच्या कार्यक्रमातून त्यांची ओळख दिपक जनार्दन खडके या व्यक्तीशी झाली. मुलींच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर खडके यांनी त्यांना वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी जोडले. या भेटीत त्यांना सांगण्यात आले की वेदिका शंकरबाबाची लेक असून तिच्या अंगात शंकरबाबा येतात. ती तुमच्या सर्व अडचणी दूर करेल आणि मुलींचे आजार बरे करतील.
 
यानंतर वेदिका नावाच्या महिलेने शंकरबाबाचा अभिनय करून दांपत्याकडून करोडो रुपये उकळवले. घर, शेती विकून पैसे जमा करायला सांगितले. मुली बऱ्या होतील अशा खोट्या आश्वासानंतर दांपत्याने इंग्लंडमधील घर विकले आणि त्याचे पैसे महिलेकडे दिले. तसेच सुपारी, नारळ, दगड ठेवण्यास सांगून शेवटी राहते घरही विकण्यास भाग पाडले. या फसवणुकीत दांपत्याला गेल्या तीन वर्षांपासून फसवले जात होते. शेवटी सत्य समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि आरोपींविरुद्ध योग्य कारवाईची तयारी सुरू केली आहे.