सीएम योगींनी ७२ कुटुंबांना दिल्या चाव्या!

मुख्तार अंसारीच्या बेकायदा जमिनीवर बांधले घर

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
लखनौ,
CM Yogi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील सरदार वल्लभभाई पटेल गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधलेल्या फ्लॅट्सचे उद्घाटन करून ७२ कुटुंबांना चाव्या सुपूर्द केल्या. विशेष म्हणजे, हे फ्लॅट्स माफिया नेते मुख्तार अन्सारीच्या अवैध कब्ज्यातून मुक्त केलेल्या जमिनीवर उभारले गेले आहेत.
 

yogi 
 
 
 
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, “हा केवळ घरवाटपाचा कार्यक्रम नाही, तर माफियांना दिलेला कठोर संदेश आहे. गरीबांच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात आता जागा नाही.”
 
योगींनी सांगितले की एलडीएने प्रत्येकी ₹१०.७० लाख किमतीचे फ्लॅट उपलब्ध करून दिले असून, त्याच ठिकाणचा बाजारभाव सुमारे ₹१ कोटी इतका आहे.
 
मुख्यमंत्री म्हणाले, “जे माफियांचे समर्थन करतात किंवा त्यांच्या कबरींवर फातिहा पठण करतात, त्यांना समजावे की आता राज्यात कायद्याचे राज्य आहे. माफिया आणि गुन्हेगारांना त्यांचीच भाषा शिकवली जात आहे.”
 
लखनऊ विकास प्राधिकरणाच्या (LDA) माहितीनुसार, या योजनेअंतर्गत डालीबाग परिसरातील सुमारे २,३२२ चौ.मी. जागेवर तीन ब्लॉक (ग्राउंड-प्लस-थ्री मजली) इमारती बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक फ्लॅटचे क्षेत्रफळ ३६.६५ चौ.मी. असून, पाणी, वीज, सुरक्षा आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
 
 
 
 
या योजनेसाठी तब्बल ८,००० अर्ज आले होते. लॉटरी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या ७२ लाभार्थ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एकता वन’ येथे आयोजित कार्यक्रमात फ्लॅट्सच्या चाव्या सुपूर्द केल्या.