पर्यावरण संतुलनात पक्षांची भुमिका महत्वाची : डॉ. गजेंद्र निकम

*पक्षी सप्ताह निमित्त बक्षिस वितरण

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
dr-gajendra-nikam जगात विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. या पक्षांच्या हालचालीवरून हवामानाचा अंदाज सुद्धा घेतला जातो. जलाशय प्रदुषित होत असतील तर त्यांची जाणीव पक्षी करून देतात त्यामुळे पर्यावरण संतुलनात पक्षांची भूमिका ही महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन पक्षी निरीक्षक डॉ. गजेंद्र निकम यांनी केले.
 
 
dr-gajendra-nikam
 
वन विभाग, सामाजिक वनीकरण व मृण्मयी मल्टीपर्पज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ऑक्टोबर रोजी पक्षी सप्ताहाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. वन्यजीव सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीसाचे वितरण यावेळी करण्यात आले. मंचावर उपवनसंरक्षक सरोज गवस, मृण्मयी मल्टीपर्पजच्या अध्यक्षा वैशाली निकम, निसर्गकट्टा अकोल्याचे अमोल सावंत, वनपरिक्षेत्राधिकारी सुनिल वाकोडे, प्रल्हाद तोंडीलायता यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वन्यजीव सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण, रंगभरण स्पर्धा यामध्ये विजय प्राप्त केलेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वनविभागातील वनदूत म्हणून उत्कृष्ठ कार्य केलेल्या वनरक्षक वनपालांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वन्यजीव सप्ताह साजरा करणार्‍या ऐडड हायस्कूल, प्रबोधन विद्यालय, सैनिकी शाळाच्या हरित सेना शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. dr-gajendra-nikam याप्रसंगी उपवनसंरक्षक सरोज गवस म्हणाल्या की, शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण, वनप्राणी संरक्षण, जंगल संरक्षण याबद्दल जनजागृती केली जाते. अशा कार्यक्रमामध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभागाच्या आधारेच जनजागृती कार्य मोठ्या प्रमाणात राबविले जाते. कार्यक्रमाचे संचलन वनरक्षक घुले यांनी केले. या कार्यक्रमाला वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.