लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Extension of deadline for e-KYC ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसीची मुदत आता वाढवण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी अद्याप आपले ई-केवायसी पूर्ण केलेले नाहीत, आणि त्यांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागत होता. त्यासाठी आता शेवटची तारीख १८ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ई-केवायसीची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महिलांना आता सुरक्षितपणे आपले ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
 
 

Extension of deadline for e-KYC 
योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी १५०० रुपये त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात लवकरच वितरित केला जाणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेत पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि ओटीपी अनिवार्य आहेत. मात्र काही महिलांना पती व वडील दोघेही नसल्यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचण येत होती. याबाबत लवकरच नवीन पर्याय किंवा तोडगा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.