गुरुदेव नानकजी महान राष्ट्र पुरुष होते ः प्रा. विजय जोशी

रा. स्व. संघाच्या वतीने गुरुदेव नानकजी यांना जयंती निमीत्त अभिवादन

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
guru-nanak-jayanti शिख पंथाचे संस्थापक गुरुनानकदेवजी महान संत, राष्ट्र पुरुष होते. भारताच्या अखंडतेसाठी, त्यांनी संपूर्ण जीवन मातृभूमीच्या चरणी समर्पीत केले. संपूर्ण विश्वामध्ये हिंदू धर्म शिख पंथाच्या अनमोल अशा अध्यात्मिक मंत्राचा, शिकवणीचा प्रचार व प्रसार केला. धर्म व राष्ट्र संरक्षणार्थ प्रवचणाद्वारे गुरुग्रंथसाहिब या माध्यमातून संघटीत शक्तीनेच समर्थ बलशाली भारत उभारणीसाठी आपले संपूर्ण जीवन निस्वार्थीपणे राष्ट्रार्पण केले. सर्वांनीच भारतमातेला विश्वगुरु पदी पोहचविण्यासाठी शुभ संकल्प करावा, हेच श्री. गुरुनानक देवजी यांना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे विभाग संयोजक प्रा. विजय जोशी यांनी केले.
 
 
guru-nanak-jayanti
 
दि. ५ नोव्हेंबर रोजी जांभरून रोड स्थित गुरुद्वारा गुरुनानक दरबार साहिब येथे सकाळी १० वाजता संपन्न अभिवादन सोहळा प्रसंगी मागदर्शन करीत होते. guru-nanak-jayanti सर्वप्रथम गुरुग्रंथ साहिब यांना प्रा. विजय जोशी, नंदू खडके यांनी पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय किसान संघ तथा संस्कृत भारतीच्या वतीने अभिवादन केले. सामूहिक आरती नंतर प्रसाद वितरीत करण्यात आला. याप्रसंगी ग्यानिजी सेवासिंग राठोड, ग्यानिजी रविसिंग राठोड, हरविंदर सिंग, गजेंद्रसिंग रजपाल, प्रितपालसिंग सेठी, इंद्रजित डिग्वा, दुर्गाप्रसाद मदान, गौरव अरोरा, श्रीमती संगीता मदान, सुनिता मदान, दिपक जोशी, गजानन जोशी, अ‍ॅड. दशरथसिंह राजपुत, त्र्यंबक नेमाने, मदन पवार, किशोर गालफाडे उपस्थित होते.