यवतमाळसह जिल्ह्यात अवैध धंदे ‘फोफावले’

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
विशेष पथक बनले शोभेची वस्तू
पोलिस अधीक्षकांनीच लक्ष देण्याची गरज
 
यवतमाळ, 
पोलिसांच्या नाकावर टिच्चून यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात Illegal businesses अवैध धंदे सुरू आहेत. यवतमाळ, कळंब, पांढरकवडासह इतर तालुक्यात मटका, जुगार, भिंगरी जोरात सुरू आहे. याकडे मात्र, संबंधित पोलिस ठाण्याचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. यवतमाळ येथे तर धामणगाव रोड, वडगावसह इतर ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे. तर कळंब हा मागास असूनही अवैध धंदे मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कळंब येथील आठवडी बाजारात भिंगरी, मटका तसेच इतर अवैध व्यवसायांना ऊत आला आहे.
 
 
avdhoot
 
काही राजकीय पदाधिकारीच या अवैध व्यवसायात गुंतल्याची चर्चा असल्याने याला राजकीय अभय तर मिळत नाही ना असा प्रश्न नागरिकांतून विचारल्या जात आहे. तसेच तर तालुक्यात रेतीची मोठी तस्करी होत असते. त्यातून तस्करांचे दोन टोळके निर्माण झाले आहे. यांनाही पोलिस व महसूल प्रशासनाचे अभय असल्याची कळंबमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात होत असलेल्या या अवैध व्यवसायांच्या मुसक्या कोण आवळणार, हा प्रश्न निर्माण झाला. Illegal businesses अवैद्य व्यवसायामुळे सामान्य जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच या व्यवसायामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाने आहेत. याकडे कोणताच राजकीय नेता पाहात नसल्याने त्यांच्याविरोधातही नाराजीचा सूर उमटत आहे.
‘साहेब’ आता तुम्हीच लक्ष द्या..!
शासनाच्या नियमाने बियर शॉपीवर बंद बॉटल विक्रीस परवानगी आहे. मात्र, अवधूतवाडी पोलिस ठाण्यातंर्गत येणार्‍या बियर शॉपीमध्ये त्याच ठिकाणी बियर पिण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. अवधूतवाडी पोलिस ठाण्यातंर्गत खुलेआम मटका, भिंगरी सुरू आहे. याकडे मात्र, संबंधित पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अवधूतवाडी पोलिस ठाण्यातंर्गत सुरू असलेल्या अवैध धंदेकडे आता पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनीच लक्ष द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.