install-smart-tod-meter महावितरणकडून लावण्यात येत असलेल्या स्मार्ट (टिओडी) मीटर मुळे वापराएवढेच अचूक वीज बिल मिळत असल्याची खात्री झाल्याने, महावितरणच्या अमरावती परिमंडळाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील १९ हजार आणि यवतमाळ जिल्ह्यातील १३ हजार असे एकुण ३२ हजार वीज ग्राहकांनी स्मार्ट (टिओडी) मीटर लावण्यासाठी महावितरणकडे मागणी केली आहे.
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टिओडी (टाईम ऑफ डे) मीटर मोफत बसविणे सुरू केले आहे. install-smart-tod-meter यात घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये वर्ष २०२५ -२६ करीता प्रति युनिट ८० पैसे सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार टिओडी मीटर धारकांना १ जुलै पासून सवलत दिली जात आहे.
शंका असल्यास दुर होणार
टिओडी मीटर हे अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारित असून अचूक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे. परिमंडळात सुमारे दोन लाख टिओडी मीटर वीज ग्राहकांकडे लावण्यात आले असून एकाही वीज ग्राहकांची मीटर बाबात तक्रार परिमंडळ कार्यालयाला प्राप्त झाली नाही. तरी शंका किंवा टिओडी मीटर बाबत संभ्रम असलेल्या वीज ग्राहकांच्या शंकेचे निरसन करण्यात येणार असल्याचे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे. install-smart-tod-meter वीज ग्राहकांना टिओडी मीटर लावणे हा शासन पुरस्कृत आणि शासन अनुदानित असलेला उपक्रम पूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांकडे टिओडी मीटर मोफत लावण्यात येत असून वीज ग्राहकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे.