पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद
मारेगाव,
पोलिस ठाणे हद्दीतून तीन अल्पवयीन मुला-मुलींना Kidnapping पळवून नेणारा अट्टल आरोपी देविदास अंगदास वावरे (वय ४४, पांढरकवडा, मूळ गाव किनगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) याच्या मुसक्या आवळत जेरबंद केले. ही कारवाई यवतमाळ गुन्हे शाखेने यशस्वी केली. आरोपी वणी, नागपूर व तेलंगणा राज्यातील अनेक गुन्ह्यांत ‘वाँटेड’ होता. पोलीस अधीक्षक कुमार चिंता मार्गदर्शनाखाली १ नोव्हेंबरपासून यवतमाळ जिल्हातील १८ वर्षाखालील अपहरण झालेल्या मुलामुलींचा ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत शोध घेणे सुरु आहे.
Kidnapping स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ३ नोव्हेंबर रोजी खास गोपनीय माहितीनुसार, मारेगाव पोलिस ठाण्यात अपराध दाखल असलेला कलम १३७ (२) मधील आरोपी देविदास अंगादास वावरे हा गुन्ह्यातील ३ पीडित बालकांसह किनगाव, ता. हिंगणघाट वर्धा येथे लपून राहत असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ कारवाई करत पथकाने आरोपीला वर्धा जिल्ह्यातील किनगाव येथून ताब्यात घेऊन तीन अल्पवयीन मुलामुलींची सुटका केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक थोरात, उपविभागिय पोलिस अधिकारी सुरेश दळवे वणी यांच्या मार्गदर्शनात सतीश चवरे, दत्ता पेंडकर, पोलिस उपनिरीक्षक धनराज सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सलमान शेख, रजनीकांत मडावी, चालक नरेश राऊत यांनी यशस्वी केली. पुढील तपास मारेगाव पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सुळे करीत आहेत.