रांगी परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शेतकर्‍यांची मेहनत पाण्यात, अवकाळीने केला शेतकर्‍यांचा घात

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
धानोरा, 
farmers-loss धानोरा तालुक्यातील रांगी, मोहली, जांगदा, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, निमनवाडा, निमगाव, बोरी परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे कापणी केलेल्या धान पिकाचे कडपा व उभ्या पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त धान पिकाचे सर्वेक्षण करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
 
 
farmers-loss
 
तालुक्यात 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या जोरदार अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. कापणी केलेले मध्यम प्रतीच्या धान अक्षरश: पाण्यात भिजून सडले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांवर निसर्ग पुन्हा कोसळल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. दुबारा संकटाने शेतकर्‍यांचे होत्याचे नव्हते केले. परिणामी शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने त्यांची निराशा वाढली आहे.
तालुक्यात अनेक शेतकर्‍यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. farmers-loss त्यामुळे असे शेतकरी प्रामुख्याने मध्यम कालावधीच्या धानाची लागवड करतात. सदर धान पीक परिपक्व झाल्याने शेतकर्‍यांनी कापणी केली. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त झाले. शेतकरी मोठ्या वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त धान पिकाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली होत आहे.