महादीप परीक्षेची दारव्हा तालुक्यात फेरी उत्साहात

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
दारव्हा, 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणार्‍या 'Mahadeep 2025-26' ‘महादीप २०२५-२६’ या महत्त्वाकांक्षी उपक‘मांतर्गत प्रथम फेरी नुकतीच दारव्हा तालुक्यात पार पडली. ही परीक्षा सर्व समावेशक या विषयावर आधारित होती.
 
 
mahadeep
 
'Mahadeep 2025-26' तालुक्यातील शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दारव्हा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २९९ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. महादीप उपक‘म हा विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमतांना वाव देण्यासाठी, त्यांच्या अध्ययनाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी जिल्हा परिषद विभागामार्फत राबवला जातो. या तालुकास्तरीय प्रथम फेरीतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील जिल्हास्तरीय फेर्‍यांसाठी पात्र ठरतील.
 
 
दारव्हा तालुका प्राथमिक शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन अत्यंत सुव्यवस्थितरित्या केले होते. परीक्षा शांततापूर्ण आणि नियमांनुसार पार पडल्याने शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढण्यास होईल अशी अपेक्षा आहे.