मोहगाव,
shivam-krishi-kendra-mohgaon मोहाडी तालुका (प्रतिनिधी) मोहगाव येथील शिवम कृषी केंद्र या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील शेतीसंबंधी खत, बी-बियाणे, औषधे व इतर कृषी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सदर आग लागण्यामागे काही संशयास्पद कारणे असल्याची चर्चा असून, आग लावण्यात आल्याचा संशय नागरिक व दुकानमालकांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पाणी वापरून आग विझविण्याचा प्रयत्न केला, आग आटोक्यात आली असून मात्र भीषण आगीत दुकानातील कृषी साहित्याच्या मोठा नुकसान झालं आगीत संपूर्ण दुकानाती साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. shivam-krishi-kendra-mohgaon आग लागण्याचे नेमके कारण समजून घेण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू असून ही आग विद्युत शॉर्टसर्किट द्वारे लागली नसून लक्षात येत असून वैर भावनेतून आग लावण्याचं संशय वर्तवला जात आहे मानवी हस्तक्षेप यावरून करडी पोलिस तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोहगाव गावात परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.