नागपूर,
Murder of a friend Nagpur दहनघाटाची स्वच्छता करुन मिळेल त्यावर उदरनिर्वाह करणाèया दोन मित्रांमध्ये जागेवरुन वाद झाला. एकाने दुसèयाच्या डोक्यात पाईपने हल्ला केला. गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरण कोतवाली पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन आरोपी मित्रास अटक केली. सूरज शंकर मेश्राम (वय 35 वर्ष रा. कार्पोरेशन कॉलोनी, गंगाबाई घाट, नागपूर) तर देवराज भजनलाल यादव (वय 37 वर्ष रा. हरई, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सूरज मेश्राम हा गेल्या काही वर्षांपासून गंगाबाई दहनघाटाच्या विसाव्याचे जागेवर साफ साई करून देणे व भिक्षा मागून उदरनिवार्ह करीत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी तेथे आरोपी देवराज यादव हासुद्धा कामाच्या शोधात नागपुरात आला होता.
मात्र, त्याच्या हाताला काम न मिळाल्यामुळे तो गंगाबाई दहनघाटावर येऊन झोपत होता. त्याला दारुचे व्यसन होते. दहनघाटावर सोबतच राहत असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली होती. गेल्या आठवड्याभरापासून सूरज आणि देवराज यांच्यात जागेवरुन वाद सुरु होता. 25 ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजता दोघांचाही वाद झाला. या वादातून देवराजने साफसाई करण्याच्या झाडूच्या लोखंडी दांड्याने सूरजवर हल्ला केला. सूरजच्या डोक्यावर पाईप लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर काही नागरिकांनी सूरजला रुग्णालयाता दाखल केले.सूरजचा उपचारादरम्यान 30 ऑक्टोबरला मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, कोतवालीचे ठाणेदार रितेश अहेर यांनी चौकशीअंती हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.