प्रलंबित बसस्थानकाचे बांधकाम त्वरित करा

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
माकपतर्फे मागणीचे निवेदन
मारेगाव, ५ नोव्हेंबर
new bus stand at Maregaon मारेगाव येथील नव्या बसस्थानकाचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात माकपतर्फे ४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय मारेगाव तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगाव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
 

mkp  
 
बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर काम जलद गतीने सुरू होते. मात्र अचानक काम थांबविण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाचा वापर करणार्‍या प्रवाशांची सतत हेळसांड होत असल्याची तीव‘ नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम सुरू न होण्यामुळे प्रवाशांना पावसात, उन्हात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयीसुविधांचा पूर्ण अभाव संबंधीत अधिकार्‍यांनी तातडीने काम सुरू करून बसस्थानक जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी बंडू गोलर यांनी निवेदनातून केली आहे.
 
 
new bus stand at Maregaon या निवेदनातून प्रशासनास सात दिवसांचा इशारा देण्यात आला असून, या कालावधीत बसस्थानकाचे काम तत्काळ सुरू न झाल्यास तिव‘ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांमधूनही बसस्थानकाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.