वाहतूक शाखेचे पीआय खंडाळे यांची वृद्धाला मारहाण?

शांतीनगर पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
PI Khandale beats up an elderly man दहीबाजार उड्डाणपुलावरुन हातठेला घेऊन घरी जाणाऱ्या एका वृद्ध फळविक्रेत्याला लकडगंज वाहतूक शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय खंदाळे यांनी मारहाण केली, असा आराेप करण्यात आला. या मारहाणीत त्या वृद्धाच्या कानाला जबर दुखापत झाली. या प्रकारामुळे उड्डाणपुलावर चांगलीच गर्दी जमली हाेती. या प्रकरणी पीआय खंडाळे यांच्याविरुद्ध शांतीनगर पाेलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. माेहम्मद फारुख (वय 65, रा.दहीबाजार) हे उदरनिर्वाह करण्यासाठी हातठेल्यावर फळे ठेवून वस्तीत िफरून विकतात. डाेळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे सायंकाळी हाेण्यापूर्वी ते घराकडे निघतात. रविवारी सायंकाळी ते फळांचा ठेला घेऊन घराकडे जात असताना दहीबाजार उड्डाणपुलावर लकडगंज वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक संजय खंडाळे हे तेथून जात हाेते. त्यांनी फारुख यांना रस्त्यावर फळे विक्री करण्यास मनाई केली.
 
 
PI Khandale beats up an elderly man
 
 
मात्र, शारुख यांनी विक्री नव्हे तर घराकडे जात असल्याचे सांगितले. तसेच रस्त्यावर ठेले लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत असल्याचे सांगत पीआय खंडाळे यांनी वृद्ध ारुख यांना मारहाण केली. त्या रस्त्याने जाणा-या फारुख यांच्या मुलाला वडिलांना मारहाण हाेताना बघितले. त्यामुळे त्यांनी पीआय खंदाळे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारण्याची धमकी दिली. जखमी वृद्धाला घेऊन मेयाे रुग्णालयात गेले असता डाॅक्टरांनी कानाचा पडदा ाटल्याचे निदान केले. त्यानंतर फारुख यांच्या कुटुंबियांनी शांतीनगर पाेलिस ठाण्यात पाेलिस निरीक्षक संजय खंदाळे यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार दिली. रस्त्यावर बसणाèया फळविक्रेत्यांकडून आणि पाणीपुरीविक्रेत्यांकडून लकडगंज वाहतूक पाेलिस महिन्याला पैसे घेतात. त्या वादातूनच ही घटना घडल्याची चर्चा आहे.
 
फळविक्रेता फारुख यांना रस्त्यावर हातठेला लावण्यास मनाई केल्यामुळे त्यांनी वाद घातला. त्यांचा हातठेला रस्त्याच्या बाजुला करीत असताना वजनकाटा त्याला लागला. मी काेणतीही मारहाण केली नाही.
संजय खंदाळे (पाेलिस निरीक्षक, लकडगंज वाहतूक विभाग