प्लॅस्टिक पिशव्यातील कचरा ठरतोय जनावरांसाठी घातक

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
काळीदौलत, 
पदार्थ किंवा साफ केलेल्या भाजीपाल्यातील टाकाऊ कचरा Plastic bags प्लॅस्टिक पिशव्यांत भरून मोकळ्या जागेवर फेकल्या जातो. त्या पिशव्यातील पदार्थ जनावरे खातात. या प्लॅस्टिक पिशव्या वारंवार जनावरांच्या पोटात गेल्यामुळे धोकादायक ठरत असून याकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही. आधुनिक काळात बाजारासाठी घरुन फार क्वचितच पिशवी घेवून जातात. घरून पिशवी घेऊन न जाणार्‍यासाठी मात्र प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी असताना परिसरात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतो.
 
 
Plastic bags
 
काम संपल्यानंतर या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यांवर पडून दिसतात. नागरिक या पिशव्यात शिल्लक अन्न व खराब खाद्य पदार्थ भरुन मोकळ्या जागेवर फेकून देत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. जनावरे खाद्यपदार्थ खाताना प्लॅस्टिकही पोटात जात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येत त्यामुळे या सर्व बाबींकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा धोका लक्षात घेता मोकळ्या जागेवर खाद्यपदार्थ भरून Plastic bags प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकू नये, यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गोरक्षकांकडून होत आहे.