राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एनसीसीतर्फे विशेष उपक्रम

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
- सायकल रॅली आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन

नागपूर, 
Raṣṭriy ekata din राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नागपूर ग्रुप, एनसीसी आणि २ महाराष्ट्र आर्टी बॅटरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत ९ किमीची सायकल रॅली तसेच ‘राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक विविधता’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
 

ncc 
 
Raṣṭriy ekata din  संपूर्ण उपक्रमाचा समन्वय लेफ्टनंट कर्नल डी. सी. कानडे, कमांडिंग ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. शहरातील विविध एनसीसी युनिट्समधील छात्रसैनिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत कॅडेट दिता अकनुरवार (२ महाराष्ट्र सिग्नल कंपनी) हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी छात्रसैनिकांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या जपणुकीची शपथ घेतली. या उपक्रमाने शहरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. पीआय स्टाफ आणि एएनओ अधिकारी यांनी सक्रियपणे सहभाग घेत कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला. या प्रसंगी नागपूर ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी सर्व सहभागी छात्रसैनिकांचे अभिनंदन करत राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.