बंगळुरू.
reality-show-dancer-dies-in-truck-collision बंगळुरूच्या बाहेरील भागात मंगळवारी सकाळी एका रस्त्यावरील अपघातात 36 वर्षीय डांसर सुधींद्र ठार झाला. तो आपल्या उभ्या कारजवळ उभा होता, त्यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. फुटेजमध्ये दिसते की सुधींद्र रस्त्याच्या कडेला उभा आहे, मागून येणारा ट्रक कारच्या दिशेने येतो आणि धडक देतो. reality-show-dancer-dies-in-truck-collision पोलिसांच्या मते धडक इतकी जोरदार होती की त्याचा घटना स्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला होता; पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे. सुधींद्र अनेक रिऍलिटी शोमध्ये भाग घेतलेला होता, त्यामुळे या मृत्यूने मनोरंजन क्षेत्रात हळहळ निर्माण केली आहे.
सौजन्य : सोशल मीडिया