गिरड परिसरातील वाघाची वनविभागाला हुलकावणी

५०वर अधिकारी-कर्मचारी मागावर

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
समुद्रपूर, 
forest-department-girad तालुक्यातील गिरड-खुर्सापार शेतशिवारात एक वाघ, वाघीण आणि तीन बछडे अश्या ५ वाघांचा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मुत संचार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये मोठी दशहत निर्माण झाली. यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला १३ सप्टेंबरला मिळाली आहे. तेव्हापासून वाघाच्या मागावर वनविभागाचे ५० च्यावर अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस असून वाघाला जेरबंद करण्यासाठी संपूर्ण जंगल पिंजून काढत आहे. मात्र, अद्याप वाघ गवसला नसून जणू वनविभागाला हुलकावणीच देत असल्याचे दिसून येत आहे.
 
 

forest-department-girad
 
सदर वाघ कधी खुर्सापार तर कधी नागपूर जिल्ह्यात फेरफटका मारत आहे. १५ दिवसानंतर पुन्हा वाघाने आपला मोर्चा खुर्सापार जंगलाकडे वळवला. त्यामुळे तीन दिवसांपासून वनविभाग वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाघाला पकडण्याची परवानगी मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक हरविंदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात ५० च्यावर अधिकारी, कर्मचारी वाघाच्या मागावर आहेत. forest-department-girad ३० सप्टेंबर पर्यंत वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, परवानगी संपली तरी वाघ गवसला नाही. वनविभागाने पुन्हा मुदत मागितली असून ती ३० डिसेंबरपर्यंत मिळाली आहे. जंगलात अनेक ठिकाणी वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेर्‍यांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
रेस्यू ऑपरेशनमध्ये पावसाचा व्यत्यय
मध्यंतरी रेस्यू ऑपरेशनमध्ये पावसाने व्यत्यय आणला. वाघाला जेरबंद करण्यासाठी जंगलात बांधून ठेवलेली ७ जनावरेही फस्त केली. हा वाघ चतूर असून तो रात्रीच्या वेळी जनावरांची शिकार करीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याला बेशुद्ध करता येत नाही. १५ दिवसानंतर पुन्हा हा वाघ खुर्सापार जंगल परिसरात आला आहे. forest-department-girad त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी दिली.

शेतकर्‍यांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी आपण स्वत: वनविभागाकडे पाठपुरावा केला. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतकरी शेतात जाण्यास धास्तावले आहे. वनविभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशा सूचना दिल्या आहेत. शेतकरी व शेतमजुरांनी वाघापासून सतर्क राहून शेतातील कामे करावी. वाघाला जेरबंद करण्यात लवकरच वनविभागाला यश येईल, अशी प्रतिक्रीया आमदार समीर कुणावार यांनी दिली.