बालगोपालांनी साकारला जंजिरा किल्ला

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Reshimbagh Nagpur दिवाळी सणाच्या आनंदमय वातावरणात वकीलपेठ, रेशीमबाग चौक येथील वर्षा पॅलेसमधील बालगोपालांनी आपल्या कल्पकतेला आणि उत्साहाला वाव देत जंजिरा किल्ला साकारला. या किल्ल्याचे विशेष आकर्षण म्हणजे त्यातील सुबक रचना, शिवकालीन वातावरणाचे प्रभावी दर्शन आणि पारंपरिक सजावट होय.
 
vinod
 
 
या उपक्रमात मनाली बढे, विद्या सिद्धम तसेच परिसरातील इतर बालमित्रांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दिवाळीचा सण साजरा करताना इतिहास आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरला.बालकांच्या या कल्पक आणि श्रमपूर्वक प्रयत्नांना परीक्षकांनी दाद देत शिवकालीन किल्ले स्पर्धेत पारितोषिक जाहीर केले. Reshimbagh Nagpurकिल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, पालक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या निमित्तानेबालमित्रांमध्ये देशभक्तीची भावना, एकोप्याची जाणीव आणि कला साकारण्याची प्रेरणा जागृत झाली.
सौजन्य : विनोद व्यवहारे ,संपर्क मित्र