राष्ट्रीय स्तरावरील सेवाव्रती प्रचारक पुरस्कार जाहीर

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
यवतमाळ, 
दलितमित्र डॉ. के. जी. जयस्वाल स्मृतीप्रित्यर्थ ९ नोव्हेंबर रोजी मानवता मंदिर, शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे कार्यकर्ता संमेलनात Sevavrati purskar सेवाव्रती पुरस्कार देण्याचे समितीने निश्चित केले आहे. सांगताना आनंद होतो की, दलितमित्र डॉ. केजी जयस्वाल हे नेत्र चिकित्सक असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी १९५२ पासून गुरुकुंज आश्रमात नेत्रचिकित्सा व शस्त्रकर्माचे कार्य सुरू केले. हे कार्य अव्याहतपणे १९८५ पर्यंत सुरू राहिले. त्यांनी हजारो नेत्र रुग्णांची शस्त्रकर्म विनामूल्य केलीत. गुरुदेव आयुर्वेद विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांना मिळणारे वेतन त्यांनी कुटुंबाचा विचार न करता संस्थेमध्ये सेवार्थ कार्यासाठी जमा केले.
 
 
jayaswal
 
Sevavrati purskar राष्ट्रसंताचे साहित्य जनमानसापर्यंत पोहचविण्याकरिता यांनी आयुष्य खर्च केले. ते संस्थेचे आजीवन प्रचारक होते. त्यांच्या या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र’ पुरस्काराने गौरवान्वित केले. त्यांचे कार्य सदोदित चिरंतन रहावे या हेतूने २००० मध्ये दलितमित्र डॉ. केजी जयस्वाल या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेअंतर्गत नेत्ररोग, कॅन्सर निदान, सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन, राष्ट्रसंतांची ग्रामगीता व साहित्याचे विनामुल्य वाटप, वृद्धाश्रमात वस्त्रदान इत्यादी प्रकल्प मागील २५ वर्षांपासून सुरू आहे.
 
 
Sevavrati purskar राष्ट्रसंतांच्या प्रचार कार्यामध्ये झटणार्‍या प्रचारकावर डॉ. जयस्वाल हे पुत्रवत प्रेम करायचे. त्यांच्या गरजा करण्याकरिता प्रयत्नशील रहायचे. त्यामुळे, ग्रामगीतेतील वर्णनानुसार ‘प्रचारक ऐसा जादूगर, त्याच्या मुठीत जनसागर’ कार्य करणार्‍या समर्पित प्रचारकाला दलितमित्र डॉ. के.जी. जयस्वाल स्मृत्यर्थ सेवाव्रती प्रचारक पुरस्कार देण्याचे निश्चित झाले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार कार्य करणार्‍या समर्पित सेवाभावी प्रचारकास देण्यात येईल. या पुरस्कारात सन्मानपत्र, शाल-श्रीफळ व ११ हजार धनादेशाचा समावेश आहे. हा पुरस्कार ९ नोव्हेंबर रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल, असे दलितमित्र डॉ. के.जी. जयस्वाल संस्थेचे अध्यक्ष दिगंबर कांडलकर, कार्याध्यक्ष डॉ. अशोक पुनसे, सदस्य प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे व डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी कळविले आहे.