श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २१ नोव्हेंबरपासून

प्रसिद्ध गायक व वादक लावणार हजेरी

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
shri-ambadevi-sangeet-seva गत १८ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेला श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीताला समर्पित ह्या संगीत समारोहात यापूर्वी अनेक दिग्गज कलाकारांनी आपली सेवा श्री अंबादेवी चरणी अर्पित केली आहे. यंदाच्या समारोहात शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी ६.३० वाजता पं. रघुनंदन पणशीकर, पुणे यांचे गायन तर दुसर्‍या सत्रात रात्री ८.३० वाजता कोलकाता येथील सुश्री रागेश्री दास या टप्पा, कजरी, ठुमरी, दादरा या दुर्मिळ होत चाललेल्या गानप्रकाराला सादर करतील.
 

shri-ambadevi-sangeet-seva 
 
दुसर्‍या दिवशी शनिवार २२ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी ६.३० वाजता धारवाड येथील सुप्रसिध्द पं. कुमार मरडूर यांचे गायन होईल. तर त्याच दिवशी दुसर्‍या सत्रात रात्री ८.३० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक पं. पूर्वायन चॅटर्जी यांचे सतारवादन होईल. त्यांना तबला संगत प्रख्यात तबलावादक श्री ओजस अढिया हे करतील. shri-ambadevi-sangeet-seva दोघांचे सवाल जवाब हे विशेष आकर्षण असेल. तिसर्‍या दिवशी रविवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दक्षिणेतील विख्यात गायिका जुळ्या बहिणी सुश्री रंजनी व गायत्री यांचे गायन होईल. तर अंतिम सत्रात रात्री ८.३० वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. अनिंदो चॅटर्जी व त्यांचे चिरंजीव अनुव्रत चॅटर्जी यांचे तबला सहवादन सादर होईल. संस्थानच्या श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात होणार्‍या या निःशुल्क संगीत सेवा समारोहाला रसिकांनी दरवर्षी प्रमाणे भरभरून प्रतिसाद द्यावा, अशी विनंती श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केली आहे.