सिद्धेश्वरी वस्तीमध्ये भाऊबीज सोहळा साजरा

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Siddheshwari Seva Vasti सिद्धेश्वरी सेवा वस्ती येथे भगिनींसाठी दिवाळी आणि भाऊबीज निमित्त साडीवाटप व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा उपक्रम संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष दादा वाधनदास तलरेजा यांच्या सौजन्याने आणि रा. स्व. संघ सेवा विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता.

amol
 
या कार्यक्रमात सेवा वस्तीतील भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनात बादल उईके, त्यांच्या पत्नी व उईके कुटुंबीय यांचे सक्रिय सहकार्य तसेच कैलाश ताकोते यांचे मार्गदर्शन लाभले. Siddheshwari Seva Vasti यावेळी सेवा विभागाचे महानगर सेवा प्रमुख हरि नारायण येवले, अयोध्या भाग सेवा प्रमुख सचिन एदलाबादकर, जानकी नगर सेवा प्रमुख अमोल बोंदरे तसेच लोककल्याण समितीचे राजेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सौजन्य:अमोल बोन्द्रे,संपर्क मित्र