कुत्तरडोह प्रकल्पातून वाशीम शहराच्या पाणीटंचाईवर त्वरीत उपाय

जिल्ह्याचे पालकत्वही घेण्यास तयार; मुख्यमंत्री फडणवीसांकडून आश्वासन

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
वाशीम, 
water-shortage-in-washim-city शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कुत्तरडोह प्रकल्पातून वाशीम शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी भाजप नेते राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामुळे प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून, नागरिकांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.

water-shortage-in-washim-city
 
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना वाशीम शहरातील अत्यंत बिकट पाणीस्थितीची सविस्तर माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून शहरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांची दररोज पाण्यासाठीची भटकंती, तसेच दूषीत पाण्यामुळे वाढणार्‍या आरोग्य समस्या या गंभीर मुुद्यांवर त्यांनी मुख्यमंत्रीसमोर ठोसपणे मांडणी केली. या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, वाशीम शहराच्या पाणी प्रश्नावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच, निवेदनावर स्वतःचा शेरा मारून संबंधित विभागांना त्वरित बैठक लावण्याचा स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता वाशीमचा पाणी प्रश्न सुटणार! अशी चर्चा शहरभर सुरू आहे. water-shortage-in-washim-city एकबुर्जी प्रकल्प तांत्रिक मर्यादामुळे व साठ्याच्या अभावामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांवर तीव्र परिणाम दिसून येत आहे.
कुत्तरडोह प्रकल्प हे मालेगाव तालुयातील मोठे जलस्रोत असून, दरवर्षी पावसाळ्यात त्यातून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी वाया जाते. या प्रकल्पातून वाशीम शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना राबविल्यास शहराच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, असे मत जलतज्ज्ञ आणि प्रशासनातील अधिकारी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे संकेत दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशीमकरांचा जीवनदायी प्रश्न हाती घेऊन मुख्यमंत्री पातळीवर चर्चा घडवून आणणारे राजू पाटील राजे हे खरंच शहरासाठी नवा आशावाद निर्माण करणारे नेते ठरत आहेत, अशा प्रतिक्रिया शहरातील विविध भागांत उमटत आहेत. water-shortage-in-washim-city या पुढाकारामुळे वाशीम शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येतून दिलासा मिळेल, तर दुसरीकडे शहराचा विकासमार्गही सुकर होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.