मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
नागपूर ,
Suryanamaskar competition समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा’ आणि ‘सूर्यनमस्कार स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

ramdas 
 
 
या स्पर्धा १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत पार पडणार असून, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने “मन आणि मनगट” या संकल्पनेवर आधारित आहेत,Suryanamaskar competition अशी माहिती नागपूरचे संयोजक प्रशांत धर्माधिकारी आणि डॉ. प्रज्ञा पुसदकर यांनी दिली.स्पर्धेची प्राथमिक फेरी शाळा स्तरावर घेतली जाईल. त्यानंतर आंतरशालेय आणि राज्यस्तरीय अंतिम फेरी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. बालवाडीपासून मोठ्या गटापर्यंत सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
सौजन्य :डॉ. प्रज्ञा पुसदकर ,संपर्क मित्र