जिल्ह्यात ११ नगरपालिकांच्या निवडणूकीच्या राजकीय हालचालींना वेग

*इच्छूकांची संख्या वाढली

    दिनांक :05-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
municipalities-elections निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संबंधित नगरपरिषदींमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर या नगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच नगरपंचायत मोताळा व संग्रामपूर यांची मुदत संपली नाही. त्यामुळे या दोन नगर पंचायतच्या निवडणुका होणार नाही असे निवडणूक विभागाने सांगितले आहे.
 

municipalities-elections 
 
विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. municipalities-elections सध्या जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी महायुतीचे आमदार, तर मेहकरमध्ये उद्धवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक आमदारासमोर स्वतःचा गड टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून, स्थानिक स्तरावर आघाड्यांचे समीकरण ठरणार असल्याचे वरिष्ठ नेत्याकडुन सांगण्यात येत आहे. ११ नगर परिषदांमध्ये २४६ नगरसेवक शिवाय ११ नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सर्वच पक्षाकडून इच्छूकांची संख्या लक्षात घेता उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. गेल्या निवडणूकीत २६७ नगरसेवकांपैकी काँग्रेस ८३ भाजप ७२, शिवसेना ४९, राष्ट्रवादी १९, भारिप ७, एमआयएम ६, अपक्ष ३१ संख्या होती. यंदा महायुती व महाविकास आघाडी याशिवाय इतर पक्ष व अपक्ष यांच्या दि. १० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी नेमका कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार अर्ज भरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.