वर्धा,
kumud-sharma-met-cm-fadnavis महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापिठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी सोमवार ३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विश्व विद्यापिठाच्या स्थापनादिवस कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी विश्व विद्यापिठाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान उभयतांनी नागपुरात होणार्या आगामी पुस्तक मेळावा, साहित्य उत्सव तसेच विश्व विद्यापिठाच्या विकास आदी विविध विषयांवर सुद्धा चर्चा केली. kumud-sharma-met-cm-fadnavis ही भेट भविष्यातील शैक्षणिक तसेच संस्थागत सहकार्याची भावना बळकट करण्यास महत्त्वाची असल्याची भावना कुलगुरू शर्मा यांनी व्यत केली.