अभाविपचे महाविद्यालय बंद आंदोलन यशस्वी

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
abvp-college-closure-agitation : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या शैक्षणिक अपयश आणि गुणवत्ता राखण्यात आलेल्या अपयशाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने आज ६ रोजी जिल्ह्यात महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. 
 
 
abvp
 
 
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यत करत वर्धेतील अनेक प्रमुख महाविद्यालयांमध्ये जाऊन व्यवस्थापनाकडे महाविद्यालय बंद करण्याची मागणी केली. बापूराव देशमुख कॉलेज, यशवंत कॉलेज, इंद्रप्रस्थ कॉलेज, जी.एस. कॉलेज, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, आयपर फार्मसी कॉलेज आणि अग्निहोत्री कॉलेज यांसारखी महाविद्यालये बंद पाडली. या आंदोलनानंतर अभाविपने १३ रोजी विद्यापिठावर मोर्चा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनात विद्यार्थी हिताचे मुद्दे, प्रवेश परीक्षा आणि निकाल संबंधित अनागोंदी, 
 
 
अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि पदभरतीमध्ये पारदर्शकता,  शिष्यवृत्ती वितरण आणि वसतिगृहाच्या सोयी-सुविधांचा अभाव, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे योग्य कार्यान्वयन, कॅम्पसमध्ये उत्साह निर्माण करणार्‍या विद्यार्थी संघटना निवडणुका आदी विषयासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.