भिडीत शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

नायलॉन मांज्याने घेतला शेतकऱ्याचा बळी

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
देवळी,
bhidi-nylon-manjya : सायंकाळी सहाच्या सुमारास भिडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत ५० वर्षीय शेतकरी सुभाष शेलूटे यांचा नायलॉन मांज्याच्या धाग्याने गळा कापल्याने मृत्यू झाला. ही घटना भिडी येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील पुलाजवळ घडली.
 
 
manja

मिळालेल्या माहितीनुसार, शेलूटे हे शेतातील फवारणीचे काम पूर्ण करून दुचाकीवरून (एम.एच. ३२ ए.जी. ४३१५) ने घरी परतत होते. यावेळी पुलाजवळ त्यांच्या गळ्यात पतंगाच्या नायलॉन मांज्याचा धागा अडकला. धागा गळ्याला घट्ट आवळल्याने त्यांचा तोल गेला आणि दुचाकी रस्त्यावर कोसळली. या भीषण अपघातात शेलूटे यांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र  पोलीस घटनास्थळी पोहोन्यास विलंब झाल्या मुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.  या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नागरिकांनी शासनाकडे नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी घालावी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. नायलॉन मांज्यामुळे घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असून, या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजना आणि जनजागृतीची गरज अधोरेखित केली आहे.