तभा वृत्तसेवा
आर्णी,
Siddheshwar Mahadev Temple : देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर बुधवारी आर्णी येथील अरुणावती नदीच्या नयनरम्य परिसरात काठावर वसलेले प्राचीन हेमाडपंती शिवालय सिद्धेश्वर महादेव मंदिर हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले.
देवदिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर, सिद्धेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त, सिद्धेश्वर भक्त मंडळ आणि भाविकांनी देवदिवाळी, कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पहाटेपासून मंदिराची स्वच्छता करून मंदिर सजवले. संध्याकाळी, मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले, दिव्यांच्या प्रकाशाने त्याचे सौंदर्य वाढले. शहरातील दानशूर व्यक्तीमत्व शंकर मारबते यांनी दिवे लावत देवदिवाळी उत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी हजारो दिवे लावल्यामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले.
या उत्सवादरम्यान, सिद्धेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष ठाकरे, सचिव राजेंद्र नवबासी, ललित पटेल, अनिल चिंतावार आणि सिद्धेश्वरभक्त मंडळाचे सदस्य, शहरातील नागरिकांसह भाविकांनी मंदिरात हजारो दिवे लावले. संध्याकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य आरती करण्यात आली. दिव्यांच्या मंद प्रकाशाने मंदिराचे सौंदर्य आणि गर्भगृहातील भगवान शिवाच्या शिवलिंगाची फुलांनी केलेली सजावट उत्कृष्ट होती. त्यात दिव्यांच्या आरासात शिवलिंगाचे सौंदर्य खुलून ते सर्वांच्या नजरेत भरत होते.
रात्री 8 वाजता भव्य आरती करण्यात आली. यामध्ये शेकडो भाविक उपस्थित होते. आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शंकर मारबते, ठाकरे, राजेंद्र नवाबासी, ललित पटेल, अनिल चिंतावार, प्रवीण मुनगिनवार, दीपक गंडेचा, जयंत डोल्हारकर, राजेंद्र शिवरामवार, राजेश माहेश्वरी, सिद्धेश्वर भक्त मंडळ, श्रेयश गुप्ता, पीयूष बेडेकर, अथर्व उपलेंचवार, आकाश मोरे, अर्जुन लोळगे, साहिल गुप्ता, लखन भणगे, राज झुनझुनवाला, अभिषेक गुप्ता, ऋषभ दुगड, डॉ. पार्थ पवार, हर्ष गुप्ता, अनिकेत पाटील, कार्तिक कोमावार, चेतन वानखेडे, यश लाड, श्रावण चव्हाण यांनी प्रयत्न केले. महाआरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.