‘वन बार-वन वाेट’विरुद्ध जिल्हा वकील संघटना सर्वाेच्च न्यायालयात

- उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
district-bar-association ‘वन बार-वन वाेट’ विरुद्ध नागपूर जिल्हा वकील संघटना सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात दिलेला निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे वकील संघटना सुप्रीम काेर्टात याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राेषण बागडे यांनी सांगितले.
 
 

one vote
 
दरम्यान हायकाेर्टाने काही वकिलांर्ते दाखल याचिकेवर अंतरिम आदेश पारित करून हाेऊ घातलेल्या हायकाेर्ट बार असाेसिएशनच्या निवडणुकीमध्ये सदस्यांना हायकाेर्ट बार व्यतिरिक्त कुठल्याही इतर बार असाेसिएशनच्या निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही, असे हमीपत्र जमा करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विविध स्तरावरील वकील संघटनांमध्ये राेष निर्माण झाला. तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील वकील संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. district-bar-association तसेच जे वकील हायकाेर्ट तसेच इतर स्थानिक न्यायालयांचे सदस्य आहेत, त्यांच्यापुढे ऐन निवडणुकीच्या ताेंडावर पेच निर्माण झाला आहे. जिल्हा वकील संघटनेने आपल्या याचिकेमध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल करून वकिलांच्या भावना हायकाेर्टासमक्ष ठेवल्या. तसेच अंतरिम आदेशाविरुद्ध सुप्रीम काेर्टात जावे काय, या मुद्यावर विशेष आमसभा बाेलावण्यात आली हाेती. त्यात 300 हून अधिक वकिलांचा सहभाग हाेता. सर्वांनी एकमताने हायकाेर्टाच्या आदेशाविरूध्द सुप्रीम काेर्टात आव्हान देण्यात यावे असे ठरविले. त्यामुळे नागपूर जिल्हा वकील संघटन सुप्रीम काेर्टात ‘वन बार-वन वाेट’ विरुद्ध याचिका दाखल करणार आहेत.