लग्नाचा तगादा; मैत्रिणीचा गळा आवळून खुन

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
वर्धा,
wardha-murder-case : सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भाड्याने राहणार्‍या  बीसीए प्रथम वर्षात शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच ओळखीच्या मित्राने गळा दाबून खुन केला. ही घटना ५ रोजी सायंकाळी उशीरा उघडकीस आली असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. आज ६ रोजी न्यायालयात नेले असता पोलिस कोठडी देण्यात आली. लग्नासाठी तगादा लावल्यानाच्या रागातून युवकाने टोकाचे पाऊल उचलत मैत्रिणीचा गळा आवळून खुन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
अल्पवयीन मुलगी हिंगणघाट तालुयातील रहिवासी आहे. ती सावंगी (मेघे) येथे शिक्षणासाठी भाड्याच्या घरात राहत होती. रोशन वावधने (रा. सावली वाघ) या युवकाची तिची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. पुढे त्यांचे प्रेम झाले. अशातच मुलीने लग्नाची मागणी केल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास रोशन वावधने हा थेट मैत्रीणीच्या खोलीवर गेला. त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान संतापलेल्या रोशनने तिचा गळा दाबून खुन केला. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याने तिचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
 
 
ही हत्येची घटना उघडकीस आल्यावर पोलिस अधीक्षक अनुराग जैन व सावंगी पोलिसांच्या चमूने तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. गुन्ह्याची नोंद घेत तपासाचे चक्र फिरवले. रोशनला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहे. रोशन वावधने याला पोलिसांनी अटक करून ६ रोजी न्यायालयात हजर केले. या ठिकाणी दोन्ही बाजूचा युतिवाद लक्षात घेऊन ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.