भास्कर राऊत
मारेगाव,
local-body-elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहे. येत्या काही दिवसात या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.अनेक इच्छुक या निवडणुकीची तयारी करीत आहे. परंतु खरा विकास हरवलेल्या या संस्थेमध्ये उमेदवारीसाठी मात्र लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे. येत्या काही दिवसांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यादृष्टीने उमेदवारांची तयारी आणि पक्षाची चाचपणी सुरू आहे. आजपर्यंत हरवलेला विकास पुन्हा या निवडणुकीमध्ये सक्रिय झाला आहे. अनेक उमेदवार स्वतःच्या एजेंड्यासोबत विकासाचा मुद्दा समोर करून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. शेतकèयांची संपूर्ण शेती ही या वर्षीच्या पावसाने वाहून गेली. सोयाबीन पीक अनेक शेतकèयांनी काढलेच नाही तर ज्यांनी काढले त्यांनी सोयाबीनचे ढीग शेतातच पेटवून दिले. सोयाबीनची अशी अवस्था असतांना कपाशीची याहूनही बिकट अवस्था झाली आहे. काही शेतकèयांचे कपाशीचे झाड हे दोन फुटाच्या वरही गेले नाही. जे झाड वाढले ते पहिल्याच वेचणीत खाली होणार आहे. सततच्या पडणाèया पावसाने शेतातील कपाशीचे पीकही नष्ट होत आहेत. वेचणीला आलेला कापूस खाली सांडत आहे. शेतकèयांचे अतोनात नुकसान होत आहे.
या विषयाला कोणत्याही नेत्याने मोठा मुद्दा धरला नाही किंवा शेतकèयांसाठी हवं तेवढं आंदोलनही तालुक्यात झालेलं नाही. शेतमालाला भाव मिळावा म्हणून कोणीही शासनाच्या विरोधात झगडले नाही. परंतु आता निवडणूक तोंडावर असताना अनेक पुढèयांना विकास आणि शेतकरी आता डोळ्यासमोर आल्यावर विकास आणि शेतकरी तसेच शेतमालाला भाव हे सगळे समोर ठेऊन निवडणुका लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे आजपर्यंत हरवलेला विकास आणि शेतकरी या विषयाला आता मुद्दा बनवून समोर येत आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्याला राजकारणाचा ग कळत नव्हता. तोही आता विकासाची आणि शेतकèयांच्या कळकळीची भाषा बोलत आहे.