वर्धा,
Municipal Council elections : वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या नगर परिषदेच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी नगर परिषदनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुती केली आहे.
१० ते १७ नोव्हेंबर दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरता येईव व त्याची प्रत त्या त्या नगरपरिषदेच्या ठिकाणी दुपारी ३ वाजतापर्यंत सुटीचे दिवस वगळता स्वीकारण्यात येईल. १८ रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशनपत्राची छाननी व लगेच वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. २५ रोजी पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. २६ रोजी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान तर ३ रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी घेण्यात येईल.
वर्धा नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी गणेश खताळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल येथे होईल.
हिंगणघाट येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी तहसिल कार्यालयात होईल. आर्वी येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल गावीत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी नप उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आर्वी येथे होणार आहे.
पुलगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार अनिकेत सोनवने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी नप कार्यालय पुलगाव येथे होणार आहे.
देवळी येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार स्नेहा क्षीरसागर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नेहा अकोडे यांची नियुती करण्यात आली आहे. मतमोजणी नप कार्यालयात होणार आहे.
सिंदी (रेल्वे) येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार बबिता आळंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी पोर्णिमा गावित यांची नियुती करण्यात आली आहे. मतमोजणी नगर परिषद कार्यालयात होणार आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कळविले आहे.