नागपूर,
Nagpur Garden Club नागपूर गार्डन क्लब, द हितवाद आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मुलांसाठी ‘रेड फ्लॉवर शो २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा रंगतदार उपक्रम १४ नोव्हेंबरला नागपूर गार्डन क्लब, जवाहर वस्ती गृहासमोर, सिव्हिल लाईन्स येथे होणार आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शोचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणप्रेम आणि निसर्गाविषयी आदरभाव निर्माण करणे हे आहे. Nagpur Garden Club शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून, अधिक माहितीसाठी नागपूर गार्डन क्लबशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र