“नेक्स्टजेन स्किल कॉन्क्लेव्ह २०२५" मध्ये आरबीयूचे राष्ट्रीय पातळीवर सुयश

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
नागपूर,
nextgen-skill-conclave-2025 : शिमला येथे नुकताच पार पडलेल्या "एज्युस्किल्स कनेक्ट २०२५ – नेक्स्टजेन स्किल कॉन्क्लेव्ह" या राष्ट्रीय परिषदेत रामदेवबाबा विद्यापीठ (आरबीयू ) ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठाने एज्युस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिप्स २०२५ मध्ये संपूर्ण भारतात दहावा क्रमांक मिळवला असून, विविध श्रेणींमध्ये सर्वोच्च पारितोषिके पटकावत राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त केले आहे.
 

nextgen-skill 
 
 
 
रामदेवबाबा विद्यापीठाला “बेस्ट परफॉर्मिंग युनिव्हर्सिटी (वेस्टर्न झोन) २०२५”, “बेस्ट परफॉर्मिंग इंस्टिट्यूट २०२५” तसेच “एआय एक्सिलन्स स्किल अवॉर्ड २०२५” ही प्रतिष्ठित पारितोषिके प्राप्त झाली. व्यक्तिगत पातळीवरही विद्यापीठाने गौरव प्राप्त केला आहे. विद्यापीठातील डॉ. रश्मी वेलेकर यांना “वूमन लिडरशिप अवॉर्ड २०२५” आणि “बेस्ट परफॉर्मिंग सेंटर ऑफ एक्सिलन्स कॉर्डिनेटर – २०२५” हे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हा सन्मान त्यांना डॉ. बुद्धा चंद्रशेखर (कार्यकारी अधिकारी, अनुवादिनी एआय अँड सीसीओ, एआयसीटीई) आणि प्रा. के. के. अग्रवाल (अध्यक्ष, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
 
एज्युस्किल्स आणि एआयसीटीई यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या ऑनलाईन व्हर्च्युअल इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत आरबीयू मधील ४ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी एडब्ल्यूएस क्लाउड, झेडस्केलर झिरो ट्रस्ट सिक्युरिटी, गुगल एआय-एमएल आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट सारख्या क्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी १ हजार ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी क्लाऊड आणि एआय क्षेत्रात यशस्वीपणे प्रमाणपत्रे मिळवली आहेत. या विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्लेसमेंट मिळाली असून, काही विद्यार्थ्यांची थेट निवड झेडस्केलर सारख्या नामांकित कंपन्यांनी केली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी रामदेवबाबा विद्यापीठाच्या उद्योगाभिमुख शिक्षण पद्धतीचे आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाचे प्रत्यंतर आहे.