नागपूर होत आहे ‘टोलेगंज इमारतींचे शहर’

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Orange City Nagpur झिरो माईल सिटी, संत्रानगरी, नागनगरी आणि टायगर कॅपिटल म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूर आता डिजिटल युगात एका नव्या ओळखीने उदयास येत आहे टोलेगंज इमारतींचे शहर म्हणून. भोसलेकालीन इतिहास लाभलेले हे शहर आता आधुनिकतेच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असून, स्वतःची नवी ओळख निर्माण करीत आहे.महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आज उंच उंच इमारतींचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे.नागपूरचा आधुनिक आणि उंच इमारतींचा चेहरा हा शहराच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचे प्रतीक ठरत आहे. भक्त बुलंद शाह यांनी स्थापन केलेल्या या शहरात आज अनेक मोठी चर्च आणि मंदिरे दिसतात. नागपूर हे दोन क्रिकेट स्टेडियम (सिव्हिल लाइन्स व जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मैदान) असलेले महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. त्यामुळे या शहराचा लौकिक अधिक वाढला आहे.
 
bulding
 
 
रोज वाढणारी लोकसंख्या, घरांची वाढती मागणी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा ओघ यामुळे शहरातील बांधकामांना अधिक वेग आला आहे. Orange City Nagpurदक्षिण, पूर्व आणि पश्चिम नागपूरमध्ये अनेक ठिकाणी गगनचुंबी प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे नागपूरला आता ‘टोलेगंज इमारतींचे शहर’ अशी नवी ओळख प्राप्त होत आहे.तथापि, या झपाट्याने वाढणाऱ्या विकासासोबत वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तरीदेखील नागपूरचा आधुनिक आणि उंच इमारतींचा चेहरा हे शहराच्या प्रगतीचे खरे प्रतीक ठरत आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र