तरुणांनो सावध वा... आता घर घेणे म्हणजे संपत्ती नाही तर आर्थिक गुलामी!

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ल,
Owning a house is not wealth देशातील प्रमुख महानगरांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आता ती एक स्वप्नवत गोष्ट ठरत आहे. बेंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांतील मालमत्तेचे दर एवढे प्रचंड वाढले आहेत की सामान्य नागरिकांसाठी घर घेणे आर्थिकदृष्ट्या जवळपास अशक्य झाले आहे. वरिष्ठ वित्तीय विश्लेषक आणि तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, आजच्या काळात घर खरेदी करणे म्हणजे संपत्ती निर्माण करणे नव्हे, तर स्वतःला आर्थिक अडचणीत ढकलणे आहे.
 
Owning a house is not wealth
लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये  म्हटले आहे की, आज शहरी भारतात घर घेण्यापेक्षा भाड्याने राहणे अधिक फायद्याचे ठरत आहे. त्यांनी स्पष्ट केले की “मालमत्ता खरेदी म्हणजे हमखास श्रीमंती” हा समज आता चुकीचा ठरला आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार, मुंबईत २ बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे २ ते २.२ कोटी रुपये, तर बेंगळुरूमध्ये ती १.२ ते १.४ कोटी रुपये आहे. याउलट या शहरांतील कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न केवळ २० ते ३० लाख रुपये इतके आहे. म्हणजेच घराचे दर हे उत्पन्नाच्या ८ ते १२ पट जास्त आहेत. जागतिक मानकानुसार, हा दर उत्पन्नाच्या ३ ते ५ पट असावा असा सल्ला दिला जातो.
 
 
गृहकर्जाच्या ईएमआयबद्दलही इशारा दिला आहे. मुंबईत २ कोटींच्या फ्लॅटसाठी दरमहा जवळपास १.४ लाखांहून अधिक ईएमआय भरावा लागतो. यामुळे कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाच्या ५० ते ७० टक्के रक्कम केवळ ईएमआयमध्ये जाते. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, “जगभरातील आर्थिक सल्लागार सुचवतात की घरभाडे किंवा ईएमआय हे उत्पन्नाच्या ३०% पेक्षा अधिक नसावे. पण भारतातील परिस्थिती याच्या पूर्ण उलट आहे.
 
 
याशिवाय, घरात गुंतवणूक केल्यावर मिळणारा परतावा देखील अत्यल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. एका अहवालानुसार, २०१३ ते २०२३ दरम्यान मुंबईत मालमत्तेच्या किमती प्रत्यक्षात १% नी घसरल्या आहेत. देशभरातही २०१० पासून दरवर्षी केवळ ३% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. भाड्यावरील परतावा फक्त २% च्या आसपास आहे जो जगातील सर्वात कमी परताव्यांपैकी एक आहे. आजच्या परिस्थितीत घर घेणे म्हणजे संपत्ती निर्माण करणे नव्हे, तर स्वतःला आर्थिक गुलामीत अडकवणे आहे.