पोहरादेवी परिसरात गोवंश चोरीच्या घटनात वाढ

    दिनांक :06-Nov-2025
Total Views |
मानोरा,
Pohradevi cattle theft गोवंश चोरीच्या घटना वाढत असून बहुतांश पशुपालक यासंबंधी तक्रार देत नसल्याने गोवंश चोरांचे मनोधैर्य वाढत असल्याने शेतकरी व पशु पालकांना पाळीव प्राण्यांना मुकावे लागत आहे व आर्थिक हानी सुद्धा सहन करावी लागत असल्याचे प्रकार भूली येथील एका शेतकर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून पुढे येत आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या नावे आजूबाजूचे पशुपालक व शेतकरी अनेक गाई व गोर्‍हे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सोडून देतात यातील अनेक गाई व गोर्‍हे बेपत्ता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. भुली येथील पशुपालक फुलसिंग झिता पवार यांची गाय व दोन गोर्‍हे सहित दोन तारखेला स्थानिक गुराख्याच्या कळपात चरायला गेली होती.
 
 
Pohradevi cattle theft
 
पैकी दोन वासरू सायंकाळी घरी परतलेत मात्र गाय आली नसल्याची तक्रार पवार यांनी पोलीस स्टेशन मानोरा येथे नोंदवली आहे. भुलीसह उमरी खुर्द, फुलउमरी आणि आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकर्‍यांचे गोवंश सुद्धा चोरी मागील काही महिन्यांपासून चोरी जात असून, शेतकरी या संबंधी तक्रार देत नसल्याने गोवंश चोरांचे फावत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. कसायांना पशुधन विकण्याच्या विरोधात असणारे तालुका व तालुयाबाहेरचे अनेक शेतकरी आपल्याकडे असलेल्या पशुधनाला पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आणून सोडतात ज्या मधून अनेक गो वंशाची चोरी केल्या जात असल्याचे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायीत्व असणारे पोहरादेवी येथील अश्वत्थामा चव्हाण यांनी माहिती देऊन प्रशासनाने चोरांच्या मुसया आवळून असले प्रकार थांबविण्याची मागणी सुद्धा लावून धरली आहे.