यवतमाळ,
Priyadarshini Uike : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांची उच्च न्यायलय खंडपीठ नागपुर येथे सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबाबत शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता विविध आदिवासी संघटनेच्या वतीने व आदिवासी समाज बांधवांकडून सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राधा मंगलम् हॉटेल धामणगाव रोड, यवतमाळ येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.